भारत -फ्रान्स व्यापारी संबंध आणखी मजबूत होणार : आयात-निर्यातीचे आकडे सर्वेच्च पातळीवर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारत आणि फ्रान्स यांच्यातील सहकार्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधही दृढ होत असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही देशांमधील व्यापार दशकातील सर्वात मजबूत पातळीवर पोहोचला आहे. दोन्ही देशांमधील आयात-निर्यातीचे आकडे किमान 1990-91 नंतरच्या सर्वोच्च पातळीवर आहेत. सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार 1990-91 पर्यंत दोन्ही देशांचा डेटा उपलब्ध आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्याचा होणार लाभ
पंतप्रधान मोदी यांचा फ्रान्स दौरा आणि तेथील बॅस्टिल डे परेडमध्ये त्यांची उपस्थिती यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील. अलीकडच्या काळात फ्रान्ससोबतच्या व्यापाराच्या वाढीमध्ये आयातीपेक्षा निर्यातीने मोठी भूमिका बजावली आहे. 2022-23 मध्ये भारतातून फ्रान्समध्ये 7.6 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात करण्यात आली. निर्यातीच्या विविध घटकांचे विश्लेषण केल्यास पेट्रोलियम उत्पादने अव्वल स्थानावर आहेत. 2022-23 मध्ये निर्यातीत त्यांचा वाटा 1.3 अब्ज डॉलर होता. यानंतर, इलेक्ट्रिकल मशिनरी-उपकरणे आणि औषधे तसेच जैविक (43.6 दशलक्ष डॉलर) च्या निर्यातीचे आकडे सर्वाधिक होते. मात्र, फ्रान्समधून थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) कमी आहे.
निर्यातीचे आकडे सर्वोच्च पातळीवर
गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा 14 टक्क्यांनी अधिक आहे. फ्रान्समधून आयात 5.8 अब्ज डॉलरवर स्थिर राहिली. निर्यातीचे आकडे गेल्या 22 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर आहेत.









