बेळगाव : मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोरे गल्ली, शहापूर व रामलिंगवाडी येथील कार्यकर्त्यांच्या वतीने मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ‘कवी कुसुमाग्रज’ व ‘मराठी भाषेचे महत्त्व’ या विषयावर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, सचिव श्रीकांत कदम यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी हावळाण्णाचे, राजाराम मजुकर, कल्लाप्पा हंडे, महेश पाटील, सुनील बोकडे, गजानन शहापूरकर, रणजित हावळाण्णाचे, अभिजीत मजुकर, रोहित वायचळ, समीर पाटील, विजय ढम, शेखर बोंगाळे, रवी जाधव, दीपक गौंडाडकर, ओमकार शिंदे यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Article‘चांगभलं’च्या गजरात भावेश्वरी यात्रेला प्रारंभ
Next Article विद्यासागर स्वामीजींच्या उपदेशाचे आचरण आवश्यक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









