शिलाँग
नव्या वर्षात दिल्ली-एनसीआरसोबत मेघालयातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रविवारी रात्री सुमारे 11 वाजून 28 मिनिटांनी जाणवलेल्या भूकंपाची तीव्रता 3.2 इतकी होती. तर भूकंपाचे केंद जमिनीत 10 किलोमीटर खाली होते. लडाखच्या कारगिलमध्येही रविवारी संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 4.6 इतकी होती. तर भूकंपाचे केंद्र जमिनीत 150 किलोमीटर खोलवर होते. तत्पूर्वी दिल्ली आणि परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाचे केंद्र हरियाणाच्या झज्जरमध्ये होते.









