दिल्ली येथे होणाऱया महिला राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड
क्रीडाप्रतिनिधी बेळगाव
केरळ येथील त्रिसूर येथे झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय महिला लीग व अग्रमानांकीत ज्युडो स्पर्धेत बेळगावच्या डीवायईएस महिलांच्या ज्युडो संघाने 9 सुवर्ण, 2 रौप्य, 9 कांस्य पदकासह उज्ज्वल यश संपादन केले. या संघाने उपविजेतेपद पटकाविले आहे. वरील संघ दिल्ली येथे ऑक्टोबर महिन्यात होणाऱया महिला राष्ट्रीय साखळी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत सबज्युनियर गटात श्वेता अलकनूरने 44 किलो वजनी गट, सोनालिका सी.एस.ने 48 किलो वजनी गट, सागुप्ता वालीकरने 52 किलो वजनी गट यांनी सुवर्ण, अमृता नाईकने 40 किलो वजनी गटात रौप्य, संजना कुरबरने 44 किलो गट, संजना शेठने 57 किलो गट यांनी कांस्य पदक पटकाविले. कॅडेट गटात ऐश्वर्या बी.ने 44 किलो वजनात सुवर्ण, रक्षित कुमारने 52 किलो वजनी गटात सुवर्ण, तिनेशा जोगानीने 63 वजनी गट, राधिकाने 70 किलो गट यांनी कांस्य पदक पटकाविले. ज्युनियर गटात अक्षता सुनकोडने 57 किलो गटात सुवर्ण, सहना एस.आर.ने 63 किलो वजनी गटात सुवर्ण, भूमिका व्ही.एन.ने 78 किलोवरील गटात सुवर्ण, साईश्वरीने 78 किलो गटात कांस्य, रक्षिता कुमारने 52 किलो गटात कांस्य तर आफ्रिन बानूने 57 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकाविले. सिनियर गटात पार्वती अंबालीने 70 किलो वजनी गटात सुवर्ण, साईश्वरीने 78 किलो गटात रौप्य, सहना एस.आर.ने 63 किलो गटात कांस्य, तर गीता के.डी.ने 52 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकाविले.
वरील सर्व विजेत्या खेळाडूंचे दिल्ली येथे होणाऱया महिला राष्ट्रीय साखळी ज्युडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना ज्युडो प्रशिक्षिका रोहिणी पाटील व कुतुजा मुलतानी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.









