डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य ; समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग आणि बॅ. नाथ पै सेवांगण यांचे आयोजन
मालवण । प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, बार्टी, बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या वतीने ५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धा गट पहिला -( सातवी ते बारावी), गट दुसरा – खुला गट अशा दोन गटात होणार आहे. गट पहिला (सातवी ते बारावी)- भारतीय संविधानातील मूलभूत हक्क व अधिकार तर गट दुसरा (खुला गट )- भारतीय संविधानाची ७५ वर्ष असे विषय देण्यात आले आहेत. पहिल्या गटासाठी वेळ -सात मिनिटे तर दुसऱ्या गटासाठी वेळ – आठ मिनिटे देण्यात आली आहे. पहिले गटातील विजेत्यांना १००० रुपये, ७०० रूपये, ५०० रुपये, तसेच प्रशस्तीपत्रक, तर खुल्या गटातील विजेत्यांना १५०० रुपये, १००० रुपये, ७०० रुपये तसेच प्रशस्तीपत्रक व उत्तेजनार्थ क्रमांक प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देण्यात येणार आहे. संपर्क लक्ष्मीकांत खोबरेकर -9422946212, संग्राम कासले 9420824874









