चिपळूण :
तालुक्यातील कळकवणे–आयनाडवाडी येथे दोन चुलत्यांनी पुतण्याला मारहाण केल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली. या प्रकरणी अलोरे–शिरगाव पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष कृष्णाजीराव शिंदे, अशोक कृष्णाजीराव शिंदे (कळकवणे) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. या बाबतची फिर्याद सुबोध दत्ताराम शिंदे (32, कळकवणे) याने दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुबोध व संतोष, अशोक शिंदे हे नात्याने पुतण्या व चुलते आहेत. सुबोध व त्याची आई हे एकत्र रहात असून त्याचे वडील दत्ताराम शिंदे हे तीस वर्षांपासून विभक्त राहतात. ते सुबोधचे चुलते, चुलती व आजीसह एकत्र कुटुंबात राहतात. संतोष, अशोक शिंदे यांनी सुबोध यास त्याच्या वडिलांच्या घरी येण्यास मनाई केली आहे. असे असताना 23 रोजी सकाळी 11 वा. कळकवणे–आयनाडवाडी सुबोध हा वडिलांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आला असता त्याच्या वडिलांनी ‘तू येथे का आलास’ असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच संतोष, अशोक यांनी बाहेर येऊन सुबोधला मारहाण केली.








