नगरसेवक सुहेल संगोळ्ळी यांचा पुढाकार : 180 कामगारांना मिळाला लाभ
बेळगाव : रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहराची स्वच्छता करणाऱ्या महापालिकेतील 180 सफाई कामगारांना नगरसेवक सुहेल संगोळ्ळी यांनी स्व-खर्चातून पँट-शर्ट, साड्या आणि जेवण देऊ केले. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार राजू सेठ, युवा काँग्रेस नेते अमन सेठ, महापालिका आरोग्याधिकारी संजीव नांद्रे आदांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. महापालिकेचे सफाई कर्मचारी सण असो वा उत्सव या काळात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची वेळोवेळी उचल करतात. सफाई कामगारांमुळेच शहर स्वच्छ राहण्यास मदत होते. मुस्लीम बांधवांच्या रमजान ईद सणाच्या निमित्ताने महापालिकेकडून सर्व सफाई कामगारांना शहराची स्वच्छता करण्यासाठी कामाला लावण्यात आले. त्यामुळे ही बाब लक्षात घेत नगरसेवक सुहेल संगोळ्ळी यांनी स्व-खर्चातून 180 सफाई कामगारांना पॅन्ट-शर्ट, साड्या आणि जेवण मोफत देऊ केले. नगरसेवकांनी सफाई कामगारांप्रती दाखविलेल्या आपुलकीने समाधान व्यक्त केल. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. यावेळी महिला सफाई कामगारांनी साड्यांचा लाभ घेण्यासह पुरुष कामगारांनी पॅन्ट-शर्टचा लाभ घेतला.









