मुख्यमंत्र्याकडून पाहणी : मे महिन्यापर्यंत काम होणार पूर्ण : डिचोली शहरातील वाहतुकीचा ताण होणार कमी.
डिचोली : व्हाळशी ते वाठादेव या सुमारे पाच किलोमीटर बायपास रस्त्याचे काम आगामी मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. कामाची गती पाहता लकवरच हे काम पूर्ण होणार आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर डिचोली शहरावरील वाहतुकीचा ताण बराच कमी होणार असून पार्किंग समस्याही काही प्रमाणात सुटणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या बायपास रस्त्याच्या कामाची संपूर्ण पाहणी केली. यावेळी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो, कार्यकारी अभियंता आत्माराम गावडे, सहायक अभियंता दिनेश तारी आदी उपस्थित होते. सदर बायपास रस्त्याचे काम प्रथमच राज्य सरकारकडून आपल्या निधीतून सुमारे सत्तर कोटी खर्चून करण्यात येत आहे. डिचोली शहरासाठी त्याचा खुप उपयोग होणार असून वाहतूक समस्या सुटणार आहे. या रस्त्यावर तीन पूल असून त्यांचे काम 80 टक्के पूर्ण झालेले आहे. नदीवरील एक पूल व उ•ाणपुलाचे काम सुरू आहे ते लवकरच पूर्ण होणार. उर्वरित काम पावसापूर्वी पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला व्हावा, यासाठीचे आदेश देण्यात आल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी सदर बायपास रस्ता वाहतुकीसाठी उपयुक्त तसेच शहरातील वाहतुकीवरील अतिरिक्त ताण कमी करण्यात महत्वाचा ठरणार आहे. तो तातडीने खुला करण्यासाठी खात्याचे प्रयत्न सुरू असून पावसापूर्वी काम पूर्ण होईल, अशी खात्री असल्याचे यावेळी सागितले. हा बायपास पूर्ण झाल्यावर डिचोली शहरातील विशेषत: अवजड वाहनांची वर्दळ बरीच कमी होणार आहे. त्यामुळे शहरातील धोकादायक वाहतुकीला रोख लागणार.









