बेळगाव : लोककल्प फाऊंडेशन व केएलई डेंटल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने खानापूर तालुक्यातील चापोली गावामध्ये दंतचिकित्सा आणि जागरुकता शिबिर घेण्यात आले. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीने कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अंतर्गत लोककल्प फाऊंडेशनच्या माध्यमातून कणकुंबी आणि जांबोटी येथील 32 गावे दत्तक घेतली आहेत. सोसायटी या भागातील लोकांना जीवनावश्यक वस्तू पुरवत आहे. चापोली गावातील सरकारी शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला. डॉक्टरांनी नेहमी ब्रश करणे, फ्लॉसिंग आणि नियमित दंततपासणी करण्यावर भर दिला. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना मोफत टूथपेस्ट आणि ब्रश देण्यात आले. या शिबिराप्रसंगी डॉ. कविता, डॉ. शिवशंकरी, डॉ. बिस्वदीप व केएलई डेंटलच्या अन्य डॉक्टरांनी सहकार्य केले.
Previous Articleशिक्षक, प्राध्यापकांसाठी ‘शिक्षक सन्मान योजना’
Next Article गौराईचे आज आगमन होणार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









