पंढरपूर :
पंढरपूर हे राज्यातील महत्वाचे तिर्थक्षेञ आहे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वर्षांला एक कोटीहुन अधिक भाविक येत असतात भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी उज्जैन व वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूरात कॉरिडॉर प्रकल्प राबविला जाणार असून तीन महिन्यात भूसंपादन करणार असल्याची माहिती मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी पंढरपूर दौ-यावर आले होते श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पञकारांशी संवाद साधला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, आ. विजयकुमार देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास प्राचीन हेरिटेज व संवर्धन करण्यासाठी शासनाने १५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मंदिरास पुरातन लुक व संवर्धन करण्याचे काम सध्या सुरू आहे. मंदिराचे सुरू असलेले काम हे आषाढी याञेच्या अगोदर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. काम पूर्ण झाले नाही तर ते आषाढी याञेच्यानंतर काम सुरू करण्यात येईल नमामी चंद्रभागेचे काम सुरू आहे हे काम लगेच पूर्ण होणार नाही काम पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार आहे येणारे पाणी ट्रॅप करावे लागणार आहे सध्या हे काम सुरू आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक पंढरपूरात येत असतात भाविकांच्यादृष्टीने पंढरपूर कॉरिडॉर करणे गरजेचे आहे. कॉरिडॉर करताना ज्या नागरिकांच्या मालमत्ता विस्थापित होणार आहेत त्यांना चांगला मोबदला देण्यात येणार आहे कॉरिडॉरसंदर्भात जिल्हा प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. सदरचा आराखडा नागरिकांना दाखविण्यात येणार आहे. यानंतर सर्वांना विश्वासात घेऊनच कॉरिडॉरचे काम केले जाणार आहे . कॉरिडॉर करताना जागा भुसंपादित करायच्या आहेत. भुसंपादनाची प्रक्रिया तीन महिन्यात केली जाणार आहे. भुसंपादनामध्ये घरे व दुकाने यांचे भुसंपादन केले जाणार आहे बाधित होणा-यांना योग्य मोबदला दिला जाणार असल्याचे मुख्यमंञी फडणवीस यांनी सांगितले.








