बेळगाव : बेंगळूर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अवमान करण्यात आला. त्यानंतर त्याचे पडसाद बेळगावमध्येही उमटले. धर्मवीर संभाजी चौक येथे म. ए. समिती आणि शिवप्रेमींनी त्याचा निषेध नोंदविला. याप्रकरणी त्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्या खटल्यांच्या सुनावणीला गुरुवारी प्रारंभ झाला आहे. खटला क्रमांक 33/22 मध्ये फिर्यादीदार आणि पंचांची साक्ष झाली. खटला क्रमांक 34/22 मध्ये फिर्यादीदारांची साक्ष झाली आहे. धर्मवीर संभाजी चौक येथे निदर्शने करण्यात आली. याप्रकरणी रमाकांत कोंडुस्कर, शुभम शेळके, माजी उपमहापौर प्रकाश शिरोळकर, माजी महापौर सरिता पाटील, भारत मेणसे, नरेश निलजकर, अंकुश केसरकर, लोकनाथ राजपूत, हरिष मुतगेकर, मदन बामणे, विनायक कंग्राळकर यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिसरे जेएमएफसी न्यायालयामध्ये या खटल्यांच्या सुनावणीला प्रारंभ झाला आहे. या खटल्यांमध्ये साक्षी सुरू झाल्याने लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे. पुढील सुनावणी 12 मार्च रोजी होणार आहे. या सर्व कार्यकर्त्यांच्यावतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. महेश बिर्जे, अॅड. हेमराज बेंचन्नावर हे काम पाहत आहेत.
Previous Articleपोलीस आयुक्तांची येळ्ळूर-हुदलीला भेट
Next Article गांधीनगर दंगल प्रकरणातून सर्वजण निर्दोष
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









