मुंबई
कॅनरा बँकेच्या समभागाने मंगळवारी नवी उंची गाठण्याची कामगिरी बाजारात पार पाडली आहे. गेल्या तीन आठवडय़ात कंपनीचा समभाग 33 टक्के इतका वाढला आहे. कॅनरा बँकेच्या समभागाने तीन वर्षानंतर 297 भावावर पोहचत नवी उच्चांकी झेप घेतली आहे. बीएसईवर मंगळवारी इंट्रा डे दरम्यान बँकेचा समभाग 2.5 टक्के इतका वाढला होता. बँकेने सप्टेंबरच्या तिमाहीत 89 टक्के वाढीसह 2525 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे.









