वृत्तसंस्था/ डोहा
आयएसएसएफच्या विश्वचषक फायनल नेमबाजी स्पर्धेत भारताचा 21 वर्षीय नेमबाज अनिश बनवालाने पुरूषांच्या 25 मि. रॅपिड फायर पिस्तूल नेमबाजीत कास्यपदक पटकावले.
पुरूषांच्या 25 मि. रॅपिड फायर पिस्तूल नेमबाजीच्या अंतिम फेरीत जर्मनीच्या पिटर फ्लोरेनने सुवर्णपदक तर चीनचा विद्यमान विश्वविजेता ली येहाँगने रौप्यपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात भारताच्या अनिश बनवालाने कास्यपदक पटकाविले. वरिष्ठांच्या विश्व नेमबाजी स्पर्धेतील अनिश बनवालाचे हे पहिले पदक आहे









