केरळमधील बिशपचे वक्तव्य
वृत्तसंस्था / तिरुअनंतपुरम
रोमन कॅथोलिक चर्चच्या थालास्सेरी आर्चबिशपनी पुन्हा एकदा रबराच्या किमती वाढविण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. केंद्र सरकारने रबरासाठीचा दर 300 रुपये प्रति किलोपर्यंत वाढविल्यगास चर्च केरळमध्ये भाजपला मदत करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
चर्चच्या मदतीने केरळमध्ये एकही खासदार नसण्याची स्थिती दूर करण्यास भाजपला यश मिळणार असल्याचे बिशपनी थालास्सेरी आर्क विभागाच्या कॅथोलिक शेतकरी संमेलनाला संबोधित करताना म्हटले आहे.
कॅथोलिक शेतकऱयांदमयान कॅथोलिक चर्चचा मोठा प्रभाव आहे आणि राज्यात बहुतांश रबराच्या बागा कॅथोलिक शेतकऱयांच्या मालकीचे आहेत. डिसेंबर 2022 पासून मार्च 2023 पर्यंत रबराचा दर 131 रुपयांपासून 151 रुपये प्रतिकिलोइतरा राहिला आहे.
बिशप यांच्या वक्तव्यावर केरळचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री मोहम्मद रियास यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रियास हे राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचे जावई देखील आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचे लक्ष्य बाळगले आहे. यामुळे मुस्लीम आणि ख्रिश्चनांसह देशाच्या अल्पसंख्याकांमध्ये भय आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींच्या पूर्ण बहुमताने यासंबंधी संघाला आवश्यक ते प्रोत्साहन मिळाले असल्याचे म्हणत रियास यांनी बिशप यांच्या भूमिकेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
माकपचे राज्य सचिव एम.व्ही. गोविंदन यांनी बिशप यांचे वक्तव्य स्पष्टपणे फेटाळून लावले आहे. अशाप्रकारच्या कुठल्याही सोशल इंजिनियरिंगचा केरळमध्ये कुठलाच प्रभाव पडणार नाही. संघ आणि भाजप केरळमध्ये कधीच यशस्वी होणार नाहीत असे गोविंदन यांनी म्हटले आहे.









