बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ संचलित रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ फौंडेशनतर्फे शनिवार दि. 9 व रविवार दि. 10 मार्च रोजी मालिनी सिटी बेळगाव येथे संध्याकाळी 6 वाजता ‘अयोध्या’ या महानाट्याचा प्रयोग आयोजित केला आहे. रामजन्म भूमीचा संघर्षमय इतिहास आणि प्रेरणादायी शौर्यगाथा याचे सुंदर सादरीकरण या व्यासपीठावर केले जाणार आहे. या कार्यक्रमाद्वारे संकलित होणाऱ्या निधीतून बेळगाव येथे एक सुसज्ज रक्तपेढी उभारण्यात येत आहे, यासाठी बेळगाव व परिसरातील बंधू-भगिनी व संघ-संस्थानी या महानाट्याचा आनंद घ्यावा आणि रक्तपेढी निर्माण करण्याच्या विधायक कार्यास सहकार्य करावे. आजच्या शुभदिनी या महानाट्याच्या मुहूर्तमेढीचा पूजाविधी संपन्न झाला. यावेळी अध्यक्ष विजय दरगशेट्टी, सचिव हेमंत कामत, महानाट्याचे संयोजक चैतन्य कुलकर्णी, माज़ी प्रांतपाल आनंद कुलकर्णी व डॉ. राजश्री कुलकर्णी, नम्रता दरगशेट्टी, आरती अंगडी, रेणू कुलकर्णी, डॉ. मनोज सुतार, उदय जोशी, प्रतिष्ठान अध्यक्ष संजीव देशपांडे, वीरधवल उपाध्ये, विरेन कलघटगी, मुकुंद बंग, राजू बडमंजी, परशुराम साळुंखे व सीमा जोशी उपस्थित होत्या. देणगी प्रवेशिका विविध केंद्रांवर तसेच ऑनलाईन उपलब्ध आहेत.
Previous Articleकरंबळ येथील लक्ष्मी देवी गदगेवर विराजमान
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









