वृत्तसंस्था/ .बुडापेस्ट
येथे सुरू असलेल्या 2023 च्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर धावपटू अविनाश साबळे पुरूषांच्या 3000 मी. स्टीपलचे चेस प्रकारात अंतिम फेरी गाठू शकला नाही. त्याला शनिवारी या क्रीडा प्रकारात पात्र फेरीमध्ये सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याचप्रमाणे या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताचे अन्य तीन अॅथलिटस्नी निराशा केली. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पुरूषांच्या 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत भारताच्या विकाससिंग, परमजीतसिंग आणि आकाशदीपसिंग यांच्याकडून चांगली कामगिरी झाली नाही. महिलांच्या लांबउडी प्रकारात भारताच्या शेलीसिंगला आपली पात्रता सिद्ध करता आली नाही. तिला 24 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. 2023 च्या अॅथलेटिक्स हंगामात अविनाश साबळेने डायमंड लीग सिरीज स्पर्धेतील तीन विविध स्पर्धांमध्ये आपला सहभाग दर्शविला होता.









