वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये 25 ते 27 एप्रिल दरम्यान दुसरी आशियाई योगासन चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धा भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळ तसेच केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि योगासन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने घेतली जाणार आहे.
या स्पर्धेत आशिया खंडातील 21 देशांचे सुमारे 170 स्पर्धक सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धा चार विविध वयोगटामध्ये घेतली जाईल. पहिल्यांदाच या स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळाले आहे. तत्पूर्वी म्हणजे 2022 साली पहिल्या आशियाई योगासन चॅम्पियनशिप स्पर्धा बँकॉक-थायलंड येथे झाली होती.









