चेन्नई :
व्यावसायिक वाहन क्षेत्रातील कंपनी अशोक लेलँड यांचा डिसेंबर तिमाहीचा निकाल जाहीर झाला असून कंपनीने एकत्रित नफ्यामध्ये 34 टक्के वाढ नोंदवली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या कालावधीत अशोक लेलँड कंपनीने 819 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे.
मागच्या आर्थिक वर्षामध्ये तिसऱ्या तिमाहित कंपनीने 608 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. याच दरम्यान सदरच्या तिमाहीमध्ये 11,995 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी याच अवधीमध्ये 11,065 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला होता.
तिसऱ्या तिमाहीतील कंपनीचा खर्च हा 10,937 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागच्या वर्षी याच अवधीत हा खर्च 10,155 कोटी रुपये होता. तिसऱ्या तिमाहीमधील नफा आणि महसूल हा सर्वकालिक उच्चांकी असल्याचे कंपनीने म्हटले आहे.









