अलिकडेच ईशान खट्टरसोबत झाले होते बेकअप
अभिनेत्री अनन्या पांडे बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करू पाहत आहे. अनेक चित्रपटांमधून झळकलेल्या अनन्याच्या वैयक्तिक तसेच प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. अभिनेत्री अनन्या आता आदित्य रॉय कपूरला डेट करत असल्याची चर्चा सुरू आहे.

अनन्या आणि आदित्यने स्वतःचे नाते गुप्त ठेवण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांच्या प्रेमसंबंधांबद्दल अधिक ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही. आदित्यचा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. तर अनन्या लवकरच ‘लायगर’ या चित्रपटात विजय देवरकोंडा याच्यासोबत झळकणार आहे.
अनन्या यापूर्वी शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरला सुमारे 3 वर्षांपासून डेट करत होती. परंतु अनन्या आणि ईशान हे परस्परांपासून वेगळे झाले आहेत. रिलेशनशिपमधून बाहेर पडल्यावरही दोघांनी परस्परांसोबत मैत्रीसंबंध कायम ठेवले आहेत. तर आदित्य आणि अनन्या अद्याप सार्वजनिक स्वरुपात एकत्र दिसून आलेले नाहीत. अनन्या ही चंकी पांडे याची मुलगी आहे. तर आदित्य रॉय कपूर हा एका दिग्गज चित्रपटनिर्मात्याचा भाऊ आहे.









