सनई-हलगीच्या सुरांमध्ये पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूक
बेळगाव : चव्हाट गल्ली येथील गणेशोत्सव मंडळाच्या बेळगावच्या राजाचरणी 15 किलो वजनाचा चांदीचा मुकुट एका भाविकांने दिला. या मुकुटाची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली, चव्हाट गल्ली येथील चव्हाटा मंदिरापासून मारुती मंदिरापर्यंत सनई व हलगीच्या सुरांमध्ये पारंपरिक पद्धतेने भव्य मिरवणूक काढण्यात आली. 15 ऑगस्ट रोजी धर्मवीर संभाजी चौक येथे बेळगावच्या राजाची पहिली झलक पहायला मिळाली. प्रथम दर्शन सोहळ्यानंतर मुकुट मिरवणूक काढण्यात आली. चव्हाटा मंदिर येथे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर चव्हाट गल्लीतील नागरिकांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी आमदार अनिल बेनके, श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत केंडूस्कर, रोहित रावळ, सोहन जाधव, प्रताप मोहिते, उत्तम नाकाडी, दिगंबर पवार, सुनील जाधव, अमर येळ्ळूरकर, चंद्रकांत कणबरकर, किसन रेडेकर यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.









