बाजारमूल्य पहिल्यांदाच 292 लाख कोटींवर : मिडकॅप-स्मॉलकॅमचीही कामगिरी मजबूत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
शेअर बाजारातील विदेशी आणि स्थानिक भांडवलाच्या तेजीमध्ये गुरुवारी सकाळी सर्व बीएसई लिस्टेड समभागांच्या मार्केट कॅपने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 292 लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. याअगोदर बीएसईचा मिडकॅपचा विक्रमी आकडा 14 डिसेंबर 2022 रोजी सेट करण्यात आला होता. त्यानंतर बाजार बंदिस्त आधारावर 291.25 लाख कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या तीन महिन्यांत सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांमध्ये सुमारे 10 टक्के वाढ झाली आहे. त्याचवेळी निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅपने बाजी मारली आहे. त्यात 16टक्के-17 टक्के वाढ झाली आहे. विदेशी भांडवल हे बाजारातील तेजीचे एक कारण राहिले असल्याचेही सांगितले आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये एफआयआयने भारतीय बाजारपेठेत आतापर्यंत 66,730 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. बीएसईवर 5,000 हून अधिक कंपन्या सूचीबद्ध आहेत. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये 5,000 हून अधिक कंपन्या सूचीबद्ध आहेत. यामध्ये म्युच्युअल फंड, एक्सचेंज ट्रेडेड फंड, आरइआयटीएस, आयएनव्हीआयटीएस, डिफरेंशियल व्होटिंग राइट्स शेअर्स आणि बीएसईच्या एसएमइ प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध कंपन्यांचा समावेश नाही.
निफ्टी 20,000 पर्यंत पोहोचू शकतो
ग्लोबल ब्रोकरेज हाऊस गोल्डमन सॅक्सने मार्चअखेर निफ्टीसाठी 20,000 चे लक्ष्य ठेवले आहे, जे सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे 7 टक्के जास्त आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ऑटो, बँका, भांडवली वस्तू, रुग्णालये आणि बांधकाम साहित्याच्या कंपन्यांच्या कामगिरीबाबत आशावादी आहे. सेन्सेक्स सध्या 63,583 च्या उच्चांकाजवळ व्यवहार करत आहे.
काल बाजार तेजीत होता
बुधवारी शेअर बाजारात तेजी होती. सेन्सेक्स 85 अंकांनी वाढून 63,228 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टीही 39 अंकांनी वाढून 18,755 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 16 वर तर 14 शेअर्सचे भाव खाली आले.









