उचगाव : बेळगाव-उचगाव मार्गावरील सुळगा गावानजीक फ्रान्सलीन आश्रम, पेट्रोलपंप या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा असलेला एक मोठा वृक्ष मंगळवारी दुपारी विद्युत तारांवरती कोसळला. विद्युत तारा आणि दोन विद्युतखांबावरच झाड रस्त्यावरती पडल्याने काहीकाळ बेळगाव-वेंगुर्ले मार्ग वाहतुकीला ठप्प झाला होता. उचगाव भागात दुपारी दोनच्या सुमाराला झालेला जोरदार वारा आणि पाऊस या तडाख्यामध्ये रस्त्याच्या दुतर्फा असलेला मोठा आंब्याचा वृक्ष कोसळला आणि तो नेमका विद्युत तारांवरती कोसळल्याने विद्युत तारांच्या दोन्ही बाजूला असलेले दोन्ही खांब झाडाच्या जोरदार तडाख्याने आणि हा मोठा वृक्ष रस्त्याच्या मधोमध कोसळल्याने पूर्णपणे वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी तातडीने काही नागरिकांनी हेस्कॉमाला कळवून या भागातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. आणि विद्युतखांब तारा बाजूला सारून हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी हजर होऊन विद्युतखांब व तारा बाहेर काढल्या. तसेच नागरिकांच्याही सहकार्यातून हा मोठा वृक्ष रस्त्याच्या बाजूला सरकवण्यात आला आणि वाहतूक हळूहळू सुरू झाली.
Previous Articleमुर्शिदाबाद हिंसाचारातील दोषींवर कारवाई करा
Next Article उचगाव परिसरात वळिवाचा जोरदार पाऊस
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









