
प्रतिनिधी /खानापूर
बेळगाव येथे मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने आज होणाऱ्या महामेळाव्यासाठी खानापूर तालुक्यातून हजारोंच्या संख्येने समितीप्रेमी सहभागी होणार आहेत. याबाबतची तालुक्यात नंदगड, लोंढा, जांबोटी व गर्लगुंजी जिल्हा पंचायत क्षेत्रात जागृती करण्यात आली असून या चारही जिल्हा पंचायत क्षेत्रातील मराठी भाषिकांनी मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचा संकल्प केला आहे. रविवारी खानापूर शहरात बाजारात तालुका म. ए. समितीच्यावतीने पत्रके वाटून जागृती करण्यात आली. तसेच महामेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी यशवंत बिरजे, मुरलीधर पाटील, जयराम देसाई, डी. एम. भोसले, अरुण पाटील, अमृत पाटील, विठ्ठल गुरव, प्रल्हाद मादार, आबासाहेब दळवी, संतोष कदम, लक्ष्मण कसर्लेकर, नारायण कापोलकर, शिवाजी पाटील, सदानंद पाटील, हणमंत जगताप, उदय भोसले, डी. एम. भोसले यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कंग्राळी बुद्रुक येथील कार्यकर्ते महामेळाव्याला उपस्थित राहाणार
कंग्राळी बुद्रुक : बेळगाव येथे सोमवारी होणाऱ्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कंग्राळी बुद्रुक गावातून शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहण्याचा निर्धार रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बोलाविलेल्या बैठकीमध्ये करण्यात आला.
यावेळी प्रशांत पवार, सदानंद चव्हाण यांनी आपली मराठी अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी कंग्राळी भागातून मराठी भाषिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सोमवारी महामेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
यावेळी ग्रा. पं. उपाध्यक्ष यल्लोजी पाटील, सदस्य नवनाथ पुजारी, तानाजी पाटील, एसडीएमसी माजी अध्यक्ष मोहन भैरटकर, म. ए. समितीचे कार्यकर्ते मल्लाप्पा पाटील, शंकर पाटील, रवी चव्हाण, ग्रा. पं. सदस्य तानाजी पाटील, जगन्नाथ चव्हाण, शिवा कोळी, गजानन पवार, विजय कडोलकरसह ग्रामस्थ उपस्थित होते.









