मिळणार चांगला पगार
खासगी कंपनीत काम करणाऱ्या लोकांना निश्चित पगार महिन्याकाठी मिळत असतो. परंतु आता एक अशी नोकरी समोर आली आहे, ज्यात काही न करता चांगला पगार मिळणार आहे. या जॉबविषयी सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. अशाप्रकारच्या नोकरीबद्दल तुम्ही आजवर कधीच ऐकले नसेल.

या नोकरीला जगातील सर्वात सोपी नोकरी म्हटले जाऊ शकते. कारण यात काहीच करावे लागणार नाही. बसल्या बसल्या पैसे मिळणार आहेत. हे नोकरी लॉन्जरी आणि स्विमवियर ब्रँड पोर मोईकडून दिली जाणार आहे. या पोस्टचे नाव कोजी कॉर्डिनेटर असून यात कंपनीची वस्त्रs परिधान करून आरामात पडून राहणे आहे. पोर मोई असा ब्रँड आहे, जो महिलांसाठी पोशाख तयार करत असतो. कोजी कॉर्डिनेटरला ही ड्रेसेस परिधान करून हातात कॉपी किंवा पुस्तक घेऊन आरामात बसून राहायचे आहे. दिवसभर सोफा किंवा काउचवर आरामात पडून राहून नेटफ्लिक्सचे शो पहावे लागतील. यादरम्यान संबंधिताला सेंटेड कँडल, गर्म काउच आणि स्पाइस्ड पंपकिन ड्रिंक देण्यात येणार आहे. या कामासोबत कोजी कॉर्डिनेटरला कंपनीच्या उत्पादनांचा रिह्यू करावा लागणार आहे.

ब्रँडकडून या पदासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यशस्वी उमेदवाराला 6 नोव्हेंबरपर्यंत कळविण्यात येईल. एक महिन्यासाठी त्याला 41,619 रुपये दिले जाणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे असणे आवश्यक आहे. कंपनी केवळ महिलांसाठी ड्रेसेस तयार करत असल्याने हे पद केवळ युवतींसाठीच आहे.









