खाणेपिणेही झाले होते बंद
शिंकणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीला शिंक येते. माणूस जेव्हा शिंकतो तेव्हा श्वासनलिकेतील अडथळे दूर करत असतो. अनेकदा श्वसनावेळी नाकात कचरा जात असतो किंवा अन्य कुठलीही बर्हिगत गोष्ट नाकात गेल्यावर शिंक येत असते. शिंकण्यादरम्यान मानवी शरीराला एक झटका बसत असतो. माणूस जेव्हा शिंकतो तेव्हा त्याच्या शरीरावर दबाव पडत असतो. अशा स्थितीत जर एखादा माणूस दिवसात हजारहून अधिक वेळा शिंकत असल्यास काय घडेल याचा विचार करा. टेक्सास येथे राहणारी केटलिन अशाच समस्यसोबत लोकांसमोर आली आहे. केटलिन एका दिवसात 12 हजारांहून अधिक वेळा शिंकत होती. यामुळे तिचे आयुष्य बिघडून गेले होते. तिला शाळेत जाता येत नव्हते. तसेच कुठल्याही मित्रमैत्रिणीला ती भेटू शकत नव्हती. यामुळे ती अत्यंत एकाकी पडली होती. शिंक येणे मानवी आयुष्याचा एक हिस्सा असला तरीही केटलिनचे जग यामुळे फार बिघडून गेले होते. ती दिवसाकाठी 12 हजारांहून अधिकवेळा शिंकत होती. शिंकण्यामुळे तिला एक वाक्यही नीटपणे बोलता येत नव्हते. बोलण्यादरम्यान तिला वारंवार शिंक येत होती. केटलिनला एवढ्या शिंका का येतात याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु अशाच प्रकारच्या समस्येने ग्रस्त अन्य एका युवतीवर डॉक्टरांनी उपचार केले आहेत. टेक्सास चिल्ड्रन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनुसार या आजाराला पीएएनडीएएस म्हटले जाते, याचा फूल फॉर्म पीडियाट्रिक ऑटोइम्युन न्युरोसायकॅट्रिक डिसऑर्डर्स असोसिएटेड विथ स्ट्रेप्टोकोक्कल इंफेक्शन असे आहे. यात माणसाला एखाद्या गोष्टीची अशी अॅलर्जी होते की त्याचे शिंकणे थांबतच नाही.









