मणेराजूरी /वार्ताहर
मणेराजूरीजवळ ओमोनी पलटी होवून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. संतोष उर्फ बंटी सुखदेव काळे ( वय ३९ ) असे या मृत युवकाचे नाव आहे. तर या अपघातात एकजण जखमी झाला. काल, रविवारी (दि.14) रात्रीच्या सुमारास मणेराजूरीतील गणपती मंदीर रोडवर हा अपघात घडला . मयत संतोष काळे हे प्रगतशील द्राक्षबागायतदार असल्याने घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत संतोष काळे हे व आणखी एकजण आपली ओमनी कार (MH-10-CX-0162 ) घेवून गणपती मंदीराजवळील आपले घरातून गावाकडे येत होते. यावेळी एका वळणावर चालकाचा कारवरील ताबा सुटून कार रस्त्याकडेच्या गटारीत पलटी झाली. यात संतोष काळे हे कारखाली आडकले होते. त्यांना तातडीने बाहेर काढून तासगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या घटनेची फिर्याद नातेवाईकांनी तासगांव पोलीसांत दिली.
Previous Articleब्लॅक संडेमुळे शहरात जनरेटरची घरघर
Next Article सीमाभाग केंद्रशासित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू








