वार्ताहर /सांबरा
बसवण कुडची येथील क्रिकेट स्पर्धेत श्री साईराम स्पोर्ट्स संघ विजेता ठरला. येथील श्री जय युवक मंडळाने श्री साईराम चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये गावातील 28 संघांनी भाग घेतला होता. रविवार दि. 18 रोजी रात्री श्री बसवाण्णा मंदिरासमोरील मैदानात श्री साईराम संघाने शिवनेरी स्पोर्ट्सला नमवत प्रथम क्रमांक पटकावला. साईराम संघाने सलग तीनवेळा गावमर्यादित क्रिकेट स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक शिवनेरी स्पोर्ट्सने तर मोरया संघाने तिसरा क्रमांक पटकावला. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आकाश अनगोळकर तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून सुनील दिवटे यांना गौरविण्यात आले. जय भीम संघाला उत्कृष्ट संघ म्हणून गौरविले. मॅन ऑफ दि सिरीजचा मान साई जोडगुंडे यांना मिळाला. यावेळी नगरसेवक बसवराज मोदगेकर, परशराम बेडका, निळकंठ स्वामी, संजू बडिगेर, राजू चौगुले, सुनील गिरी, बसवंत मुचंडीकर, नागेश बेडका व जय युवक मंडळाचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.









