वृत्तसंस्था/ बेंगळूर
2023 च्या प्रो-लिग कबड्डी हंगामातील येथे रविवारी रात्री खेळविण्यात आलेल्या सामन्यात कर्णधार मनिंदरसिंगच्या शानदार कामगिरीच्या जोरावर बंगाल वॉरियर्सने तामिळ थैलवासचा 48-38 अशा गुणफरकाने पराभव केला. या सामन्यात कर्णधार मनिंदरसिंगने 16 गुण नोंदविले.
मध्यंतरापर्यंत तामिळ संघाने बंगाल वॉरियर्सला कडवी लढत दिली होती. मनिंदरसिंगच्या सुपर चढाईवर बंगाल वॉरियर्सने तामिळ संघाने घेतलेली आघाडी थोडी कमी केली. यावेळी तामिळ संघ 3 गुणांनी आघाडीवर होता. 29 व्या मिनिटाला तामिळचे सर्व गडी बाद झाल्याने बंगालने तामिळ संघावर 31-29 अशी 2 गुणांची आघाडी मिळविली होती. सामन्याच्या उत्तरार्धात बंगाल वॉरियर्सने दर्जेदार खेळ करुन अखेर हा सामना 10 गुणांच्या फरकाने जिंकला.









