वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तराखंडचा 20 वषीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने सोमवारी येथे इंडिया खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचे अजिंक्मयपद पटकावले. दरम्यान, आगामी होणाऱया सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर-300 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून दमछाक झाल्यामुळे लक्ष्य सेनने माघार घेतली आहे.
येथे झालेल्या इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनने अंतिम सामन्यात सिंगापूरच्या लोह किन यूचा पराभव करून पुरुष एकेरीचे अजिंक्मयपद पटकाविले होते. 2022 च्या बॅडमिंटन हंगामाच्या प्रारंभीच लक्ष्य सेनने सुपर-500 बॅडमिंटन स्पर्धेतील आपले पहिले विजेतेपद मिळविले. या स्पर्धेनंतर लक्ष्य सेनला थकवा जाणवू लागल्याने त्याने सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. गेल्या महिन्यात स्पेनमध्ये झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनने कांस्यपदक पटकाविले होते. लक्ष्य सेनला प्रकाश पदुकोन यांचे मार्गदर्शन लाभत आहे. येत्या मार्चमध्ये होणाऱया अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेसाठी आपण सरावावर यापुढे लक्ष केंद्रित करणार असल्याचे लक्ष्य सेनने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी मिश्र दुहेरीचे जेतेपद मिळविले आहे. या जोडीने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवडय़ात के. श्रीकांत, अश्विनी पोनाप्पा आणि मनु अत्री हे कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला मुकावे लागले होते.









