मुंबई
मागच्या आठवडय़ात सेन्सेक्समधील 10 पैकी 8 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 2.34 लाख कोटींनी वाढले असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. यादरम्यान रिलायन्स इंडस्ट्रिज, इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या भांडवलात चांगली वाढ झाल्याचे दिसले. मागच्या आठवडय़ात बीएसई 30 समभागांचा सेन्सेक्स 2.47 टक्के म्हणजेच 1478 अंकांनी वाढला आहे. रिलायन्सच्या बाजार भांडवलात 69,503 कोटींची भर पडली आहे.









