प्रतिनिधी /बेळगाव
महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने धर्मवीर संभाजी चौक येथून प्रकाशफेरी काढण्यात आली. या फेरीत अधिकारी व समाजबांधवांनी मोठय़ा संख्येने भाग घेतला होता.
सायंकाळी धर्मवीर संभाजी चौक येथून प्रकाशफेरीला सुरुवात झाली. कॉलेज रोड, चन्नम्मा सर्कलमार्गे ही फेरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात पोहोचली. बाबासाहेबांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून फेरीची सांगता झाली. सोमवार दि. 6 डिसेंबर रोजी प्रा. के. डी. मंत्रेशी यांचे उद्यानात व्याख्यान होणार आहे.
यावेळी प्रा. के. डी. मंत्रेशी, मल्लेश चौगुले, समाज कल्याण खात्याच्या उमा सालीगौडर, मल्लेश कुरंगी, मल्लेश कोलकार, बसवराज रायगोळ, सिद्धाप्पा कांबळे, सिदराय मेत्री, जीवन कुरणे, संतोष हलगेकर, आकाश हलगेकर, शंकर कांबळे, श्री. चन्नण्णावर आदींसह समाजबांधव उपस्थित होते.









