केपीएमजी फर्मच्या अहवालात माहिती उघड : 44 कंपन्यांचे आयपीओ सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आर्थिक वर्ष 2020 ते 2022 या कालावधीमध्ये 81 आयपीओनी 1.52 लाख कोटी रुपयांची उभारणी केली असल्याची माहिती केपीएमजी यांनी आपल्या अहवालामध्ये दिली आहे. केपीएमजी ही जागतिक अकौंटींग फर्म आहे, ज्यांनी अलीकडेच आयपीओंसंदर्भातली माहिती एकत्रित केली आहे.
आर्थिक वर्ष 2020 ते 2022 या कालावधीमध्ये 81 आयपीओ एकंदर बाजारामध्ये दाखल झाले होते. सदरच्या आयपीओच्या माध्यमातून 1.52 लाख कोटी रुपयांची उभारणी करण्यात आली आहे.
कंपन्यांचा 25 ते 36 टक्के परतावा
बाजारात दाखल झालेल्या बहुतेक सर्व कंपन्यांनी गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला असल्याचे दिसून आले आहे. यामधील 26 कंपन्यांपैकी 4 कंपन्या सरासरी शंभर टक्के प्रीमियमसह बाजारात लिस्टेड झाल्या आहेत. त्याचप्रमाणे लिस्टेड कंपन्यांनी 36 टक्के इतका परतावा गुंतवणूकदारांना दिला असल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये पहिल्या नऊ महिन्यांमध्ये 44 कंपन्यांनी आपल्या आयपीओचे सादरीकरण केले आहे. यामध्ये त्यांचा परतावा 26 टक्के इतका राहिला असून 17 कंपन्यांनी 25 टक्के इतका परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे.









