मुंबई
मार्च महिन्यामध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी(एफपीआय) शेअरबाजारामध्ये 7936 कोटी रुपयांची भर घातली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या आधीच्या दोन महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांनी बाजारातील पैसे काढण्याची मोहीम राबवली होती. परंतु गेल्या मार्च महिन्यामध्ये मात्र विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात गुंतवणूकीत रस दाखवला होता. अदानी समूहाच्या संदर्भातील हिंडनबर्ग यांच्या अहवालामुळे मागच्या दोन महिन्यांमध्ये (जानेवारी-फेबुवारी) गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये काहीशी निराशा बाजारामध्ये अनुभवायला मिळाली होती.









