हिमाचल प्रदेशमधील दुर्घटना, चौघे जखमी
► वृत्तसंस्था/ चंदिगढ
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात सहा पोलीस कर्मचाऱ्यांसह सात जणांचा मृत्यू झाला. तीसा-बैरगड मार्गावरील तरवई पुलाजवळ बोलेरो गाडी रस्त्यावरून पलटी होऊन बैरा नदीत कोसळली. या अपघातात सात जणांना जीव गमवावा लागला. तर चार जण जखमी झाले आहेत. बोलेरो गाडी मांगलीहून तिसाकडे जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. मृतांमध्ये 6 पोलीस कर्मचाऱ्यांसह 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तीन जखमींना अधिक उपचारार्थ चंबा येथील वैद्यकीय इस्पितळात हलविण्यात आले आहे. तर एकावर तिसा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.









