खार्तूम : सूदानची राजधानी खार्तूममध्ये सैन्य आणि निमलष्करी दलादरम्यान सुरू असलेल्या लढाईला 2 महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला आहे. याचदरम्यान म्योगमा नावाच्या एका अनाथाश्रमात उपासमारीमुळे 60 मुलांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 महिन्याच्या नवजाताचाही समावेश आहे. संघर्षामुळे सूदानमधील पुरवठा साखळीच ठप्प झाली आहे. अनाथाश्रमात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या मुलांचे व्हिडिओ तयार करून जागतिक समुदायाला मदतीचे आवाहन केले आहे. युद्धामुळे त्रस्त लोक आता स्वत:च्या मुलांना अनाथाश्रमात सोडत आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून म्योगमा अनाथाश्रमात 400 मुले आहेत. तर त्यांची देखभाल करण्यासाठी केवळ 20 कर्मचारी आहेत. नवजातांना दर तीन तासांनी अन्न देण्याची गरज आहे, परंतु आता आमच्याकडे काहीच उरले नसल्याचे तेथे काम करणाऱ्या डॉक्टरने सांगितले.मुलांना वाचविण्यासाठी आम्ही सातत्याने आवाहन करत आहोत, परंतु याला कुठलेच यश मिळाले नसल्याचे एका डॉक्टरने सांगितले.
Previous Articleभारत-नेपाळमध्ये ‘रामायण सर्किट’ करार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









