सैफ अली खान, अर्जुन कपूर, जॅकलीन फर्नांडिस आणि यामी गौतम हे कलाकार असलेल्या ‘भुत पुलिस’ चित्रपटाचे उपग्रह आणि डिजिटल हक्क निर्माते रमेश तौरानी यांनी स्टार नेटवर्कला विकले आहेत. हा व्यवहार सुमारे 60-65 कोटी रुपयांमध्ये झाल्याचे सांगण्यात येते. यातील 45 कोटी रुपये डिजिटल राइट्स आणि 15-20 कोटी रुपये उपग्रहीय हक्कांसाठी मिळाल्याचे समजते. पवन कृपलानी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार या चित्रपटाचे बजेट सुमारे 40 कोटी रुपयांचे आहे. अशा स्थितीत निर्मात्याला हक्क विकून 20-25 कोटी रुपयांचा नफा प्राप्त झाला आहे.
Previous Articleपहिल्यांदाच लॅबमध्ये आईच्या दूधाची निर्मिती
Next Article धर्माहून व्यवहार श्रेष्ठ
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









