स्वतःच्या मुलांना आईचे दूध न पाजू शकणाऱया जगभरातील लाखो पालकांना दिलासा मिळणार आहे. अमेरिकेतील महिला वैज्ञानिकांच्या जोडीने जगात पहिल्यांदाच प्रयोगशाळेत आईचे दूध तयार करण्यास यश मिळविले आहे. या दूधाला ‘बायोमिल्क’ नाव देण्यात आले आहे. बायोमिल्कच्या पोषकतेची तपासणी केली आहे. खऱया आईच्या दूधाप्रमोच शेकडो प्रोटीन, फॅटी ऍसिड आणि अन्य पोषक घटक मोठय़ा प्रमाणात मिसळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आईच्या दूधातील पोषक तत्वांपेक्षा हे दूध चांगले असल्याचा दावा संबंधित कंपनीने केला आहे. लैला स्ट्रिकलँड या संशोधिकेने 2013 मध्ये प्रयोगशाळेत मेमरी पेशी निर्माण करण्याचे काम हाती घेतले. 2019 मध्ये त्यांनी फूडसायन्स तज्ञ मिशेन इग्गेर यांच्यासोबत भागीदारी केली. या दोघांनी मिळून स्वतःचा स्टाटर्अप ‘बायोमिल्क’ सुरू केला.
प्रयोगशाळेत निर्माण करण्यात आलेल्या मेमरी पेशींनी दूधात आढळणारे दोन मुख्य पदार्थ शर्करा आणि केसीन तयार केल्याची घोषणा फेब्रुवारी महिन्यात दोघींनी केली होती. त्यानंतर मातेचे दूध तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला. पुढील 3 वर्षांमध्ये हे दूध बाजारात उपलब्ध होणार असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले आहे.









