एका ठिकाणी होत नाही कुणाचाच मृत्यू
हिमालयात अशी अनेक ठिकाणे आहेत, जी रहस्यांनी भरलेली आहेत. या रहस्यांची उकल अद्याप वैज्ञानिकांना करता आलेली नाही. या ठिकाणांना भेट दिल्यावरही वैज्ञानिकांना कुठलेच यश मिळालेले नाही.
गुरुडोंगमार सरोवर
हिमालयातील हे सरोवर रहस्यमय मानले जाते. गुरु पद्मसंभवशी या सरोवराचा संबंध आहे. स्थानिक लोकांच्या आग्रहावर गुरु पद्मसंभव यांनी सरोवराच्या एका भागावर स्वतःचा हात ठेवला, ज्यानंतर अत्यंत कडाक्याच्या थंडीतही सरोवराचा हा भाग गोठत नसल्याचे सांगण्यात येते. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे हा भाग सोडून उर्वरित पूर्ण सरोवर गोठून जाते. शतकांपासून हे सरोवर लोकांसाठी पिण्याच्या पाण्याचा स्रोत आहे.

कोंगका ला खिंड
लडाखमधील कोंगका ला खिंडीच्या ठिकाणी जाणे अत्यंत अवघड आहे. हे ठिकाण हिमाच्छादित आहे. 1962 मध्ये भारत-चीन युद्धानंतर दोन्ही देशांचे सैनिक या ठिकाणी संचलन करणार नाहीत अशी सहमती झाली होती. तेव्हापासून हे ठिकाण अत्यंत निर्जन आहे. स्थानिक लोकांनुसरा कोंगका ला खिंडीच्या भागात केवळ सिद्धपुरुषच जाऊ शकतात. या ठिकाणी दर महिन्याला परग्रहवासीय येतात अशीही मान्यता आहे. परंतु हा दावा अद्याप सिद्ध झालेला नाही.

ज्ञानगंज
ज्ञानगंज सध्या तिबेटमधील कैलास पर्वत आणि मानसरोवरानजीक स्थित आहे. धार्मिक मान्यतेनुसार येथे एक आश्रम आहे. या आश्रमाची निर्मिती भगवान विश्वकर्मा यांनी केली आहे. या ठिकाणी भगवान राम, श्रीकृष्ण, बुद्ध हे अद्याप शरीर रुपात असल्याचीही मान्यता आहे. याचबरोबर आश्रमात महर्षि वशिष्ठ, विश्वामित्र, महायोगी गोरखनाथ, श्रीमद् शंकराचार्य, भीष्म, कृपाचार्य, कणाद, पुलस्त्य यांना भौतिक स्वरुपात पाहिले जाऊ शकते अशीही मान्यता आहे. स्वामी विशुद्धानंद परमहंस यांनी सर्वप्रथम या ठिकाणाबद्दल लोकांना माहिती दिली होती.

गंगखर पुनसुम
गंगखर पुनसुम या शिखराला आतापर्यंत कुणीच सर करू शकलेले नाही. भूतानमधील या शिखरावर हिममानव यति राहत असल्याची मान्यता आहे. यति पाहिल्याचा दावा अनेक गिर्यारोहकांसह स्थानिक लोकांनी केला आहे. तिबेटचे लोक त्याला घाबरतात आणि त्याची पूजा करतात. उंच शिखराला तिबेटचे लोक देव मानतात. याचमुळे गंगखर पुनसुमच्या शिखरावर जाण्याची अनुमती नाही.

टायगर नेस्ट मठ
पर्वतानजीक असलेल्या या मठादरम्यान एक गुहा आहे. गुरु पद्मसंभव यांनी तीन वर्षे, तीन महिने, तीन दिवस आणि तीन तासांपर्यंत येथे तपस्या केली होती अशी मान्यता आहे. गुरु पद्मसंभव हे वाघिणीवर स्वार होत या गुहेपर्यंत पोहोचल्याची कथा आहे. या गुहेला टायगर मठ नावानेही ओळखले जाते.









