आकाश हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणालीचे यशस्वी परीक्षण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय वायुदलाने रविवारी आणखी एक मोठी कामगिरी नोंदविली आहे. वायुदलाने स्वत:च्या आकाश हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणालीचे यशस्वी परीक्षण केले आहे. या क्षेपणास्त्र यंत्रणेने एकाचवेळी चार लक्ष्यांचा वेध घेतला आहे. सिंगल फायरिंग युनिटद्वारे कमांड गायडेन्सच्या आधारे 4 लक्ष्यांना भेदण्यात आल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
अलिकडेच पार पडलेल्घ्या अस्त्रशक्ती 2023 या अभ्यासादरम्यान भारताने स्वदेशी आकाश क्षेपणास्त्र प्रणालीच्या मारक क्षमतेचे प्रदर्शन केले होते. तेथे एकाच आकाश फायरिंग युनिटद्वारे एकाचवेळी चार लक्ष्यांना (मानवरहित हवाई लक्ष्य) भेदण्यात आले आहे. हे प्रदर्शन 12 डिसेंबर रोजी सूर्यलंका वायुदल तळावर अस्त्रशक्ती 2023 दरम्यान भारतीय वायुदलाकडून आयोजित करण्यात आले होते.
स्वदेशी आकाश शस्त्र यंत्रणेला डीआरडीओने विकसित केले आहे. आकाश शस्त्रास्त्र यंत्रणा एक स्वदेशी सुरक्षा यंत्रणा असून याच्या खरेदीसाठी अनेक देशांनी उत्सुकता दाखविली आहे. डीआरडीओचे वैज्ञानिक सातत्याने या यंत्रणेत सुधारणा घडवून आणत आहेत.
आकाश भारत डायनेमिक्स लिमिटेडची (बीडीएल) एक कमी पल्ल्याचे जमिनीवरून आकाशात (एसएएम) मारा करणारी हवाई सुरक्षा यंत्रणा आहे. ही यंत्रणा शत्रूच्या हवाई हल्ल्यांपासून एका मोठ्या भूभागाचे रक्षण करू शकते. आकाश शस्त्रास्त्र यंत्रणा (एडब्ल्यूएस) ग्रूप मोड किंवा ऑटोनॉमस मोडमध्ये एकाचवेळी अनेक लक्ष्यांना भेदू शकते. यात बिल्ट-इन इलेक्ट्रॉनिक काउंटर-काउंटर मेजर्सची क्षमता सामी आहे. संपूर्ण शस्त्रास्त्र प्रणालीला मोबाइल प्लॅटफॉर्मवर तैनात करण्यात आले आहे.
आकाश क्षेपणास्त्र यंत्रणा 4-25 किलोमीटरच्या कक्षेत उ•ाण करणारे हेलिकॉप्टर, लढाऊ विमान आणि युएव्हीला प्रभावीपणे नष्ट करू शकते. लक्ष्याचा शोध घेण्यापासून ते पाडविण्यापर्यंतची पूर्ण प्रक्रिया विद्युतवेगाने पूर्ण करते. याचबरोबर याची पूर्ण यंत्रणा ऑटोमेटिक आहे. ही अॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह जॅमिंगला प्रभावीपणे रोखण्यास सक्षम आहे. रेल्वे किंवा रस्तेमार्गाद्वारे ही यंत्रणा कुठेही नेता येते आणि जलदपणे ती तैनात देखील करता येते.









