नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मे महिन्याच्या प्रारंभापासून सुरू होणाऱया 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेसाठी ऑनलाईन नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्यास 28 एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. यापूर्वी 24 तारखेपासून नोंदणी सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. आता सुधारित नियोजनानुसार लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी तीन दिवस अगोदर म्हणजे येत्या बुधवारपासून ही नोंदणी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. लसीसाठीची नोंदणी कोविन ऍप आणि cowin.gov.in या वेबसाईटवर करता येणार आहे. तसेच आरोग्य सेतू ऍपवरही रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा उपलब्ध आहे.









