2022 साली 408 अपघातात 33 गंभीर, 21 किरकोळ जखमावर बचावले : सन 2021 साली 300 अपघातात 37 गंभीर, 20 किरकोळ जखमी

प्रतिनिधी /फोंडा
फोंडा पोलीस स्थानकाच्या हद्दीत सन 2022 साली रस्त्यावरील अपघातात एकूण 26 जणांनी जीव गमावला. तर 33 जण गंभीररित्या व 21 जण किरकोळ जखमावर बचावले. सरत्या वर्षात एकूण 408 अपघातांची नेंद फेंडा पोलीस स्थानकात झालेली आहे. अपघातात सापडलेल्या एकूण 497 वाहनामध्ये सर्वाधिक 180 दुचाकीचा समावेश असून त्याच्या पाठोपाठ 133 चारचाकीचा आहे. तसेच 15 प्रवासी बस, 58 अवजड वाहने, 2 कंटेनर, 6 टेम्पो, 10 पिकअप अशा वाहनांचा समावेश आहे.

फोंडा पोलीस स्थानकाची कार्यक्षेत्रात 19 ग्रामपंचायती व धारबांदोडा तालुक्यातील धारबांदोडा ग्रामपंचायतीचा समावेश आहे. फोंडा पोलिसांचे कार्यक्षेत भौगोलिकरित्या अवाढव्य असल्याने माशेल ते कापसे पंचवाडीपर्यंत पोलिसांना नजर ठेवावी लागते. मडकई, उसगांव-गांजे, शिरोडा, प्रियोळ, बेतोडा निरंकाल पर्यंत कार्यक्षेत्र फोंडा पोलिसांच्या हद्दीत येते. म्हार्दोळ येथे होऊ घातलेल्या पोलीस स्थानकाचे पुर्ण झाल्यानंतर फोंडा पोलिसांवर ताण थोडा कमी हाईल.
सन 2021 साली 300 अपघातात 25 जणांनी गमावला जीव
कोरोनानंतर सावरताना अपघातांची आकडेवारी कमी झालेली दिसली. सन 2021 साली रस्त्यावरील अपघातात एकूण 25 जणांनी जीव गमावला तर 37 जण गंभीररित्या जखमी व 20 जण किरकोळ जखमावर बचावले. एकूण 300 अपघातांची नोंद फोंडा पोलीस स्थानकात झाली आहे. अपघातात सापडलेल्या एकूण 497 वाहनामध्ये सर्वाधिक 239 दुचाकीचा समावेश असून त्याच्या पाठोपाठ 155 चारचाकीचा आहे. तसेच 8 प्रवासी बस, 55 अवजड वाहने, 12 कंटेनर, 1 ट्रोली, 8 टेम्पो, 1 जीपगाडी, 14 पिकअप अशा वाहनांचा समावेश होता. तर कोरोना काळाचा उगम झालेल्या सन 2020 साली रस्ते अपघातात एकूण 34 जणांनी जीव गमावला होता.
फोंडा शहर व इतर काही पंचायत क्षेत्रामध्ये गेल्या सात वर्षापासून मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरु आहे. बहुतेक रस्ते चेंबरसाठी खोदल्यानंतर त्यांची व्यवस्थितपणे डागडुजी करण्यात आलेली नाही. अपघातांमागील असुरक्षित रस्ते हेही एक प्रमुख कारण ठरलेले आहे. फर्मागुडी-ढवळी येथील उड्डाणपुलावरील अभियांत्रिकी कौशल्यात फेल ठरलेल्या वळणावर दर महिन्याला अवजड वाहने दुभाजकावर कलंडण्य़ाचे अपघात घडत आहे. भरघाव वेगाने दुचाकी हाकणाऱयांवर कारवाई झाल्यास अपघाताचे प्रमाण आटोक्यात येणे शक्य आहे.
फर्मागुडी येथील अपघातात दोघा मुलीचे पितृछत्र हरपले..
फेब्रुवारी महिन्यात फोंडा-पणजी महमार्गावरील फर्मागुडी-फोंडा येथील धोकादायक जीव्हीएम सर्कलजवळील वळणावर कंटेनरचे दुचाकीचालकाला ठोकरल्याने दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेली त्याची पत्नी गंभीर जखमी झाली होती. दुचाकीवरून पत्नीसह फोंडा मार्केट येथून बाजारहटीनंतर आपल्या कुकळय़े येथील राहत्या खोलीकडे परतीच्या वाटेवर असताना जीव्हीएम सर्कलजवळ हा अपघात घडला होता. जीव्हीएम सर्कलजवळ कंटेनरने ढवळी-फर्मागुडी बायपासमार्गे वळविताना कंटेनरच्या पुढील चाकात सापडलेल्या दुचाकीचालकाला सुमारे दहा मिटर फरफटत नेले. यात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू होऊन दोघा मुलीच पितृछत्र हरपले होते.
ओपा रोड जन्क्शनवर ऑनडय़ुटी पोलीसाला ठोकरले होते
मे महिन्यात दिल्लीस्थित गोव्यात दाखल झालेल्या एका युवा पर्यटकाने फोंडय़ात धुमस्टाईलने केलेल्या कारगाडीच्या थरारात ऑन डय़ुटीवरील एका पोलीस कॉन्स्टेबलला ठोकरून त्याला हात फ्रक्चर व डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. ओपारोड-खांडेपार जन्क्शनवर हा अपघात घडला होता. त्यानंतर पलायन करून गेलेल्या चारचाकीचा आमिगेस हॉटेल धारबांदोडा येथे स्वयंअपघातात चारचाकीने पेट घेत या थरारनाटय़ाचा समारोप झाला होता. सुदैवाने पोलिसांनी पेटण्याच पवित्र्यात असलेल्या चारीचाकीतून त्या पर्यटक चालकाला बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला होता.









