वृत्तसंस्था/ आगरतळा
त्रिपुरा विधानसभेच्या चार पोटनिवडणुका 23 जून या दिवशी होणार असून त्यासाठी आता मैदानात 22 उमेदवार राहिले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. आगरतळा, बार्डोवालीनगर, सुरमा आणि जुबराजनगर हे ते चार मतदारसंघ आहेत. या चार मतदारसंघांमध्ये एकंदर 24 उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. त्यातील दोन अर्ज अवैध ठरविण्यात आले. त्यामुळे आता 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.









