नवी दिल्ली
आटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी मारूती सुझुकीने वर्ष 2021 मध्ये 2 लाखाहून अधिक कार्सची निर्यात केली असल्याचे समजते. यापूर्वीच्या कॅलेंडर वर्षांचा विचार करता गेल्या वर्षी कार्सची निर्यात सर्वाधिक केल्याचे स्पष्ट होते आहे. कंपनीने एकंदर 2 लाख 5 हजार 450 मोटारींची निर्यात केली असून दर्जा, तंत्रज्ञान, विश्वास, कामगिरी आणि योग्य किमतीच्या जोरावर जागतिक स्तरावर कंपनीने ही निर्यातीची कामगिरी साध्य केली आहे. जिमी तसेच नव्या सेलेरियोसह जवळपास 15 कार्स कंपनीने निर्यात केल्या आहेत.









