नवी दिल्ली
सॅमसंगने आपल्या गॅलक्सी एस 21 एफई 5 जी स्मार्टफोनची घोषणा केली असून तो येत्या 11 जानेवारीला लाँच केला जाणार असल्याचे सांगितले आहे. कोरियन कंपनीचा हा स्मार्टफोन स्लीम व हलक्या वजनाचा असणार असून विविध वैशिष्टय़े यात असतील. याला 5 एनएम प्रोसेसर 64 बिट ऑक्टोकोर प्रोसेसर असणार असून 6.4 इंच फुल्ल एचडी प्लस डायनॅमिक अमोलेड 2 एक्स डिस्प्लेच्या स्क्रीनसह ट्रिपल कॅमेरा यात असेल.









