वार्ताहर /सावईवेरे
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात होत असलेल्या राज्यातील पहिल्या विधानसभा निवडणूकीसाठी 80 वर्षावरील ज्येष्ठ व्यक्तीना घरी मतदानाचा हक्क बजावण्याची सोय करण्यात आलेली आहे. काल रविवार 6 फेब्रु. रोजी देऊळवाडा वळवई येथील सावित्रीबाई नरसिंह तारी या 103 वर्षीय वृद्ध महिलेने मतदानाचा हक्क बजावला.
निवडणूक अधिकाऱयातर्फे पोस्टल बॅलेट प्रक्रियेतून मतदानाची प्रक्रिया पार पडत या महिलेने मतदान केले. प्रत्यक्ष 14 फेब्रुवारी रोजी मतदानकेंद्रावर न जाता घरीच मतदान करण्याची व्यवस्था केल्याने या उपक्रमाचे कौतुक करून निवडणूक आयोग व अधिकाऱयांचे त्याच्या कुटूंबियांनी आभार मानले.









