प्रतिनिधी /पणजी
आमाराल (बांध) ताळगाव येथील श्री सातेरी देवी प्रतिष्ठापना श्रींचा 31 वा वर्धापदिन सोहळा मंगळवार दि. 15 ते सोमवार दि. 21 फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमानिशी साजरा होणार आहे.
मंगळवार दि, 15 रोजी सकाळी 6 वा. लघुदेली महाभिषेक, अलंकाराविधी श्री गणेश, नांदीश्रद्धा, पुण्याहवाचन, कलश स्थापन, नवचंडी पारायण आणि हवन, सकाळी 10 ते 11 पर्यंत सुवासिनींकडून श्रींस कुंकुमार्चन, तद्नंतर पुर्णाहूती, महाआरती आणि महाप्रसाद. संध्याकाळी 7 वा. पालखी मिरवणूक, भजनाचा कार्यक्रम, पालखीचे देवस्थानात आगमन झाल्यावर आरती, तीर्थप्रदास होईल.
बुधवार दि. 16 ते सोमवार दि. 21 फेब्रुवारी पर्यंत प्रतिदिन दररोज सकाळी 6 वाजता श्रींस अभिषेक, अन्य धार्मिक विधी, दुपारी 12 व. आरती व तीर्थप्रसाद, संध्याकाळी 7 वा. भजनाचा कार्यक्रम, 8.30 वा. पालखी मिरवणूक, तद्नंतर फळफळावणीची पावणी झाल्यानंतर आरती व तीर्थप्रसाद होईल. या कार्यक्रमास महाजन मंडळी व भाविकांनी उपस्थित राहावे असे सातेरी देवस्थान समितीने कळविले आहे.









