इंग्लंडच्या शवागारात इलेक्ट्रीशियनचे क्रूरकृत्य – 34 वर्षांनी मिळणार शिक्षा
वृत्तसंस्था / लंडन
इंग्लंडच्या ईस्ट ससेक्स राज्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे हीथफील्ड टाउनमध्ये 34 वर्षांनी क्रूरकृत्यांच्या गुन्हेगाराला शिक्षा मिळणार आहे. न्यायालयाने संबंधिताला महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरविले आहे. आता 67 वर्षांचा झालेल्या डेव्हिड फुलरने हे गुन्हे केले आहेत. तो 12 वर्षांपर्यंत शवागारात महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार करत राहिला, त्याने सुमारे 100 महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार केले होते.
1989 पासून 12 वर्षांपर्यंत तो ही क्ररकृत्ये करत राहिला. फुलर तेथे इलेक्ट्रीशियन होता. रात्री उशिरापर्यंत शवागारात तो काम करायचा, तेव्हा अन्य कर्मचारी निघून गेलेले असायचे असे चौकशीत समोर आले होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी इंग्लंड पोलिसांना 2.5 दशलक्ष युरोंचा (सुमारे 21.42 कोटी रुपये) खर्च आला आहे.
गुन्हे कसे उघडकीस आले?
फुलरने 1987 मध्ये वेंडी नेल आणि कॅरोलीन पियर्स नावाच्या 2 महिलांची हत्या केली होती. नेल यांची 23 जून 1987 रोजी त्यांच्या घरीच हत्या केली. नेल यांच्या टॉवेल आणि लाळेत फुलर यांचा डीएनए मिळाला होता. 24 नोव्हेंबर 1987 रोजी कॅरोलीन पियर्स यांचे अपहरण करण्यात आले होते. शेजाऱयांनी त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकला होता. एका आठवडय़ानंतर त्यांचा मृतदेह एका धरणात तरंगताना आढळला होता. फुलर दोन्ही महिलांना पूर्वीपासून ओळखत होता. नेल काम करत असलेल्या फोटो डेव्हलपमेंट चेनचा तो ग्राहक होता. तर पियर्स मॅनेजर असलेल्या बस्टर ब्राउन रेस्टॉरंटमध्येही तो गेला होता. या घटनांच्या 24 वर्षांनी सप्टेंबर 2011 मध्ये त्याला अटक करण्यात आली.
78 मृतदेहांची ओळख पटली
हा खटला मेडस्टोन क्राउन न्यायालयात चालला. फुलरला 51 गुन्हय़ांमध्ये दोषी ठरविण्यात आले. दोन्ही शवागारांमध्ये फुलरने बलात्कार केलेल्या 78 मृतदेहांची ओळख पटली आहे. न्यायाधीश चीमा-ग्रब यांनी ज्युरींना हत्येच्या दोन्ही प्रकरणांमध्ये त्याला दोषी ठरविण्याचा निर्देश दिला आहे.
झडतीत मिळाले अश्लील साहित्य
झडतीदरम्यान फुलरच्या घरातून अश्लील चित्रे, मुलांच्या मृतदेहासोबतच्या अश्लील चित्रफिती, हार्ड ड्राइव्ह, फ्लॉपी डिस्क, डीव्हीडी आणि मेमरी कार्ड हस्तगत करण्यात आले. सर्व गोष्टी वेगवेगळय़ा फोल्डरमध्ये ठेवण्यात आल्या होत्या.









