केवळ भारतीय कंपन्यांनाच निविदा प्रक्रियेत प्रवेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जम्मू येथील वायुतळावर ड्रोन हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाने ड्रोनविरोधी यंत्रणा खरेदी करण्याची प्रक्रिया गतिमान केली आहे. यानुसार वायुदलासाठी 10 काउंटर अनमॅन्ड एअरक्राफ्ट सिस्टीम (सीयुएएस) खरेदी करण्याकरता रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन (आरएफआय) देखील जारी करण्यात आले आहे.
आरएफआयनुसार केवळ भारतीय कंपनीच या प्रक्रियेत सहभागी होऊ शकते. करारावर स्वाक्षरी केल्यावर लवकरात लवकरच सीयुएएसची डिलिव्हरी सुरू केली जाईल आणि 12 महिन्यांमध्ये ऑर्डर पूर्ण करावी लागणार आहे.
अत्याधुनिक यंत्रणा
यंत्रणेत युएव्हीचा शोध लावण्यासाठी रडार, रेडिओ फ्रिक्वेंसी सेंसर, इलेक्ट्रो ऑप्टिकल, अँटी इन्फ्रारेड सिस्टीम युएव्ही शोधण्यासाठी आणि ट्रेस करण्यासाठी असायला हवी. या यंत्रणेत सॉफ्ट किल ऑप्शन असणे आवश्यक आहे. यात ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट जॅमर सिस्टीम, आरएएफ जॅमर आणि हार्ड किल ऑप्शन (लेजर-डीईडब्ल्यू) सामील असू शकतात.
27 जून रोजी ड्रोन हल्ला
जम्मू वायुतळावर 27 जून रोजी ड्रोन हल्ला झाला होता. देशातील हा पहिला ड्रोन हल्ला असल्याने आता सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या घटनेनंतर तिन्ही संरक्षण दलांसाठी ड्रोनविरोधी यंत्रणेकरता वेगाने पावले उचलली जात आहेत.
या वैशिष्टय़ांवर भार
सीयुएएस मल्टी सेन्सर
मल्टी किल सोल्युशन
ऑपरेटरसाठी एअर सिच्युएशनल पिक्चर
मापदंडांच्या आधारावर अलर्ट करण्याची क्षमता









