मुंबई
आयपीओ बाजारात दाखल करण्याच्या प्रक्रियेला बळ मिळत असून 1 सप्टेंबरला दोन आयपीओ सादर केले जाणार आहेत. यामध्ये विजया डायनॉस्टिक सेंटर व ऍमी ऑरगॅनिक्स यांचे आयपीओ बुधवारी खुले होणार आहेत. या आयपीओतून 2465 कोटी उभारले जाणार आहेत. यापूर्वी देवयानी इंटरनॅशनल, तुवाको विस्टास कॉर्पोरेशन व कारटेड टेकसह आठ कंपन्यांनी मागच्या महिनाभरात 18 हजार 243 कोटी रुपये उभारले आहेत.









