गुन्हा अन्वेषण पथकाची कारवाई, 2.70 लाखांची रक्कम जप्त, सहाजणाना अटक
प्रतिनिधी / वाळपई
सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात पत्त्यांची जुगारी अड्डे सुरू आहेत. यावर कारवाई करण्याची मागणी सातत्याने नागरिकांकडून होताना दिसत होती. स्थानीक पोलीस यंत्रणेकडे तक्रारी करून सुद्धा याकडे लक्ष देण्यात येत नसल्याचे नागरिकांचे आरोप आहे. अशाच प्रकारचा जुगारी अड्डा गेल्या चार दिवसापासून होंडाच्या मध्यवर्ती भागापासून अवघ्याच अंतरावर असलेल्या एका पडक्मया इमारतीमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने धाड घातली. ही कारवाई रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
निरीक्षण दत्तगुरु सावंत यांच्या नेतृत्वाखाली घालण्यात आलेल्या धाडीत जवळपास 2,0760 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून इतर स्वरूपाच्या सामानाची जप्त करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयाच्या अनेक ठिकाणी जुगारी अड्डे मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत .गाव लोकवस्तीपासून निर्मनुष्य ठिकाणी पडक्मया खोपीमध्ये व इमारतीमध्ये हे जुगारी अड्डे सुरू आहेत. यावर कारवाई करण्याची मागणी अनेकवार करण्यात आली .मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात न आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. होंडा याठिकाणी गेल्या चार दिवसापासून शहराच्या मध्यवर्ती भागातून अवघ्याच अंतरावर असलेल्या एक्मया जीर्ण स्वरूपाच्या इमारतीमध्ये जुगार अड्डा सुरू झाला होता .यामुळे स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात तक्रारी अनेकवार स्थानिक पोलीस यंत्रणेकडे केल्या होत्या .मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात न आल्याचे समजते.
यामुळे काही त्रस्त नागरिकांनी यासंदर्भाची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱयांकडे करण्यात आल्यानंतर यासंदर्भात कारवाई करण्यात आली.
रविवारी पहाटे जवळपास चार वाजण्याच्या सुमारास ही धाड घालण्यात आली .या धाडीत एकूण सहा जणांना अटक करण्यात आली असून याद्वारे 207060 अशा रोख रक्कम जप्त करण्यात आली असून इतर स्वरूपाचे सामान जप्त करण्यात आल्याचे मिळालेल्या माहितीनुसार समजते .याविभागाचे निरीक्षक दत्तगुरु सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाड घालण्यात आली. दत्तगुरु सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की या धाडीत एकूण सहा जणांना अटक करण्यात आली असून या जुगारी वाडय़ावरील इतर सामानाची जप्त करण्यात आलेली आहे.









